“गद्दारांना सोडणार नाही, माझं काम ठोकायचं” शिंदेंच्या बंडानंतर नितीन नांदगावकर संतप्त

 

 

महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. त्यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीही सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसह राज्याच्या राजकारण मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर शिवसैनिकांमध्ये एकच रोष पाहिल्याचे मिळाले. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. यातच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते नितिन नांदगावकर यांनी संताप व्यक्त करत थेट इशारा दिला आहे.

 

गद्दारांना सोडणार नाही. माझे काम ठोकायचे आहे. याआधी समाजकंटकांना ठोकून काढत होतो. मात्र, आता मला असे वाटतेय की गद्दारांना चोपायची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया नितिन नांदगावकर यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

 

तसेच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसैनिकांनी मुंबईत तीव्र रोष व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. गद्दारांना माफी नाही. मुंबईत एकनाथ शिंदे यांनी पाय ठेवून दाखवावा. त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया संतप्त शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.

Team Global News Marathi: