ईडी कडून आमदार प्रताप सरनाईक यांची सहा तास चौकशी

ईडी कडून आमदार प्रताप सरनाईक यांची सहा तास चौकशी

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना उच्च न्यायालयाकडून अटक करण्यापासून पासून संरक्षण मिळाल्यानंतर आता ते ईडी कार्यालयासमोर हजर होणार आहेत. आमदार प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक आज (१० डिसेंबर) ईडीसमोर हजर होणार आहे. टॉप्स सिक्युरिटी मनी लॉन्डरिंग घोटाळ्याबाबत २४ नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. याप्रकरणी त्यांची आज चौकशी करण्यात आली.

प्रताप सरनाईक यांची यावेळी जवळपास सहा तास चौकशी करण्यात आली. याआधी ईडीने प्रताप सरनाईक यांना दोन वेळा समन्स बजावला होता. त्यानंतर आज गुरूवारी सरनाईक या चौकशीसाठी प्रत्यक्षात ईडीच्या कार्यालयात हजर राहिले होते.

आज दिवसभरात जवळपास सहा तास त्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, यापुढच्या तपासासाठी मी स्वतः हजर राहण्याची आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका ईडीकडे मांडली आहे. तसेच भविष्यात ईडीने केव्हाही बोलावले तर मी नोटीस नसताना सुद्धा हजर राहील असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: