“मोदी आणि शहा आंदोलापासून दूर राहूनच सल्ला देत असताना राज्यातील भक्त आंदोलन करत आहेत”

ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात भारतीय जनता पक्ष चक्का जाम आंदोलन करत आहे. पुण्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले. यावेळी, ‘जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा भाजपा नेत्यांनी दिला आहे. आता भाजपच्या या आंदोलनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

‘पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सांगत आहेत की आंदोलन करू नका, आंदोलनांपासून लांब राहा आणि राज्यातले त्यांचेच भक्त आता आंदोलन करणार आहेत. असा टोला पवारांनी भाजपाला लगावला होता. ते आज पत्रकार अध्यमांशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला आहे.

पुढे फडणवीसांच्या वक्तव्याचा सॅकमहार घेताना ते म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस यांना जे काही गौप्यस्फोट करायचे आहेत ते त्यांनी खुशाल करावेत. महाराष्ट्रात मीडिया अजून शिल्लक आहे. त्यांच्या माध्यमातून काय गौप्यस्फोट करायचे आहेत ते करा. त्यासाठी राज्याला वेठीला धरू नका. राज्यात कोरोनाची स्थिती आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला आहे. केंद्राने जे संसदेच्या अधिवेशनाबाबत केलं ती परिस्थितीही लक्षात घ्या असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे.

Team Global News Marathi: