जिल्हा बँक निवडणुकीवरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला विरोधकांवर टोला!

 

सातारा | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांवरून सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच “सातारा जिल्हा बँकेच्या पॅनेलमध्ये मला घेणारे ते कोण मी ठरवतो कुठे जायचे ते माझी जिरवण्यासाठी फील्डिंग लावणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे मला विरोध करा पण सभासदांची जिरवू नका”, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पॅनलवर निशाणा साधला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की, “असं का? लै मस्ती आलीये? बघू. तुम्ही इकडचे, तिकडचे बोलवून घ्या लोकांना…आपण टाईट करु, जिरवू. माझी नका जिरवू, मेहेरबानी करा, माझी विनंती आहे. मी तुमचा कोणाचा दुश्मन नाही, हात जोडून विनंती करतो. बँक शेतकरी सभासदांची आहे, मी त्या गोरगरीब शेतकऱी बांधवांच्या वतीने विनंती करतो, त्यांची जिरवू नका. हात जोडून विनंती करतो, माझी जिरवायची तर जिरवा”.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत साताऱ्याच्या दोन्ही राजांचा संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सर्वपक्षीय पॅनेलमध्ये समावेश केला नसल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी जाब विचारला होता. याबाबत मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न शरद पवार यांना विचारा, असे स्पष्ट करत बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना पवारांकडे जाण्याचा सल्ला दिला होता.

Team Global News Marathi: