मित्रानेच केला मित्राचा दगडाने ठेचून खून; कारण ऐकून थक्क व्हाल

ग्लोबल न्यूज – मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी येथे घडला आहे. एकत्र जेवण करताना मित्राने शिवी दिली. त्यामुळे दुस-या मित्राने शिवी देणा-या मित्राला चापट मारली. यावरून शिवी देणा-या मित्राने चापट मारणा-या मित्राचा पाठलाग करून दगडाने ठेचून खून केला.

ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू गावात खटकाळी वस्ती येथे घडली. प्रफुल्ल संपत गायकवाड (वय 27, रा. आसु, ता. फलटण, जि. सातारा) असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. दीपक दिगंबर भिमटे (वय 23, रा. सोळू, ता. खेड. मूळ रा. मोतीबाग, नागपूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी संतोष रामचंद्र निंबाळकर (वय 42, रा. माळवाडी, सोळू, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बाईलाही सेक्सची गरज असते की सेक्ससाठी बाईची गरज असते’ आवर्जून वाचा एका स्त्रीची कहाणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष निंबाळकर यांचा सोळू गावात सोळू गावातील खटकाळी वस्ती येथे पाण्याच्या जारचा प्लांट आहे. त्यावर मागील आठ महिन्यांपासून आरोपी दीपक काम करत आहे. तो जार प्लांटच्या शेजारी त्याचा मित्र प्रफुल्ल याच्यासोबत भाड्याच्या खोलीत राहत होता.

शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता आरोपी दीपक आणि मयत प्रफुल्ल दोघेजण जार प्लांट मध्ये जेवण करून गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दीपकने प्रफुल्ल याला शिवी दिली. त्यामुळे प्रफुल्लने दीपकला चापट मारली. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि प्रफुल्ल प्लांटमधून बाहेर पडून रस्त्याने पळू लागला.

साडी फेडणं लय सोप्प असतंय…वाचा सविस्तर-

दीपक हा प्रफुल्लचा पाठलाग करत होता. दीपकने चीढून प्रफुल्लच्या डोक्यात दगड मारला. त्यानंतर प्रफुल्ल रस्त्यावर पडला. प्रफुल्लच्या डोक्यातून रक्त येत असताना दीपकने आणखी त्याला दगडाने मारले.

त्यानंतर दीपक फिर्यादी संतोष यांच्या घरासमोर येऊन बसला. मध्यरात्री अडीच वाजता संतोष झोपेतून लघुशंकेसाठी उठले असता दीपक त्यांच्या घरासमोर बसल्याचे दिसले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने प्रफुल्लचा खून केल्याचे सांगितले. दीपकला घरापुढेच बसण्यास सांगून संतोष यांनी आळंदी पोलिसांना बोलावून घेतले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दीपकला ताब्यात घेत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: