फॉक्सकॉनवरून विरोधकांची फक्त नौटंकी, मोठी गुंतवणूक लवकरच

 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकारण तापले असून शिंदे गट आणि विरोधात बसलेल्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार शीतयुद्ध पेटले आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकावर जोरदार निशाणा साधला आहे विरोधकांची नौटंकी सुरू आहे, अशी टीका करतानाच राज्यात लवकरच मोठी गुंतवणूक आणू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले.

आमचे सरकार आल्यानंतर आम्ही वेदांता कंपनीला जागा दाखवली होती. तेव्हाच आम्हाला समजले होते की, ते गुजरातला जाणार आहेत. त्यावेळेस आम्ही त्यांना पत्र लिहिली, स्वत: जाऊन भेटलो. त्यांना चांगले पॅकेज देऊ, चांगली जागा देऊ, असेही सांगितले होते. पण, त्यांचा निर्णय आधीच झाला होता. आता महाविकास आघाडी नौटंकी करत आहे. पण, वेदांतापेक्षा चांगली गुंतवणूक राज्यात आणू, हेच विरोधकांसाठी आमचे उत्तर असेल, असे फडणवीस म्हणाले.

गुजरात सरकारने एक ‘डॅशबोर्ड’ सुरू केला आहे, ज्यात राज्यातील सर्व प्रकल्पांबाबत सर्व माहिती दिली जाते. तसाच डॅशबोर्ड महाराष्ट्रात करता येईल का, यावर विचार सुरू आहे. तिकडे, हरियाणामध्येही ‘परिवार पहेचानपत्र’ योजना आहे, याशिवाय विविध राज्यात ज्या चांगल्या योजना सुरू आहे, त्या राज्यात कशा सुरू करता येतील, यावर आम्ही विचार करत आहोत, या गोष्टी पाहण्यासाठी मंत्रीदेखील संबंधित राज्यात जाणार आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

Team Global News Marathi: