शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ, मुलगा आणि जावयाच्या घरी ईडीच्या धाडी !

 

शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब , खासदार भावना गवळी यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर आता त्यांनी आपलारोख सेने माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याकडे वळवला असून माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचा माजी आमदार मुलगा व जावई यांची निवासस्थाने तसेच कार्यालयांवर एकूण सहा ठिकाणी ईडीने धाडसत्र राबविले.

मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केल्याची माहिती आहे. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार केला असून सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेन्शनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम, गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप ईडीकडे नोंदविलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

ता तक्रारीवरून ईडीने बुधवारी अडसुळांसह माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजित अडसूळ व जावई यांची घरे, कार्यालयांची झाडाझडती घेतली. ईडीला चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. अभिजित हे २००९ मध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. खातेदार, ठेवीदारांनी तक्रारी केल्या होत्या याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे.

Team Global News Marathi: