खांडवीचे माजी सरपंच आप्पासाहेब पाटील यांचे निधन
बार्शी;तालुक्यातील खांडवीचे माजी सरपंच आप्पासाहेब अभिमान पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवार दिनांक 15 रोजी निधन झाले. त्यांचे वय 50 वर्ष होते.
खांडवी व परिसरातील एक लोकप्रिय व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती., ते दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ व बहिणी असा मोठा परिवार आहे. ते कांदलगाव चे उपसरपंच कैलास फुरडे-पाटील यांचे मामा होते.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.