राष्ट्रवादीच्या माजी आमदार ज्योती पप्पू कलानी यांचे निधन

ठाणे – उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. त्यांचे निधन राहत्या घरीच झाले असून त्या 71 वर्षांच्या होत्या.

 

सध्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी आमदार पप्पू कलानी यांच्या त्या पत्नी होत्या. तर त्यांच्या पश्चात मुलगा ओमी कलानी, सून माजी महापौर पंचम दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. उल्हासनगर महापालिकेच्या त्या 2001 ते 2007 पर्यंत स्थायी समितीच्या सभापती होत्या. 2005 मध्ये त्या उल्हासनगर महापालिकेच्या महापौर झाल्या होत्या.

तर 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार म्हणून निवडून आल्या, तसेच राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून गेली अनेक वर्षे त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पदीही भूषवले होते, माजी आमदार ज्योती कलानी यांच्या निधनानंतर उल्हासनगर शहरात शोककळा पसरली असून अनेक राजकीय नेते शोक व्यक्त करीत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: