पंढरपूरच्या जागेसाठी भाजपचे आजी-माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात ? राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी जोरदार लॉबिंग सुरु झाली आहे. एकीकडे भालके यांच्या वारसाला या जागेवर संधी देण्याचा विचार होत असताना राष्ट्र्वादीने उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ठता दिलेली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या भाजपचे आमदार आणि माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. लोकांच्या मनातील उमेदवार दिला जाईल असेही रोहित पवार म्हणाले आहेत. आमदार रोहित पवार गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी यावर भाष्य केले आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, जो योग्य उमेदवार असेल त्यांच्या सोबतच राष्ट्रवादी राहणार आहे. सध्या भाजपात आमदार असलेले आणि माजी आमदार असलेले अनेकजण राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. पोट निवडणुकीसाठी योग्य आणि जनतेच्या मनातील उमेदवार दिला जाईल. तत्पूर्वी पक्षाकडून मतदार संघाचा सर्वे केला जाईल. त्यानंतर योग्य उमेदवार दिला जाईल असे त्यांनी बोलून दाखविले.

पंढरपूरच्या जागेसाठी भाजपचे आजी-माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात ?

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी जोरदार लॉबिंग सुरु झाली आहे. एकीकडे भालके यांच्या वारसाला या जागेवर संधी देण्याचा विचार होत असताना राष्ट्र्वादीने उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ठता दिलेली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या भाजपचे आमदार आणि माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. लोकांच्या मनातील उमेदवार दिला जाईल असेही रोहित पवार म्हणाले आहेत. आमदार रोहित पवार गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी यावर भाष्य केले आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले की, जो योग्य उमेदवार असेल त्यांच्या सोबतच राष्ट्रवादी राहणार आहे. सध्या भाजपात आमदार असलेले आणि माजी आमदार असलेले अनेकजण राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. पोट निवडणुकीसाठी योग्य आणि जनतेच्या मनातील उमेदवार दिला जाईल. तत्पूर्वी पक्षाकडून मतदार संघाचा सर्वे केला जाईल. त्यानंतर योग्य उमेदवार दिला जाईल असे त्यांनी बोलून दाखविले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: