राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेने केली जय्यत तयारी, मंगळवारी कोणाचे वाजणार बारा ?

  1. ठाणे | ठाण्यात मंगळवारी होत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर सभेची उत्सुकता वाढली आहे.राज ठाकरे या सभेत कुणाकुणाची उत्तरक्रिया करतात याकडे जनतेचे लक्ष लागले असुन ठाण्याची मनसेही सभेच्या जय्यत तयारीला लागली आहे.उत्तर सभेसाठी ठाण्यात येत असलेल्या राज ठाकरे यांचे स्वागत भगवे झेंडे घेतलेल्या तब्बल २०० चारचाकी आणि १००० दुचाकीस्वारांची रॅली ठाण्याच्या वेशीवरून थेट सभास्थानापर्यत करणार आहेत.त्यामुळे, अवघे ठाणे मनसेमय बनले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याला केलेल्या हिंदुत्वाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत.राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेण्यासाठी राज ठाकरे यांची ‘उत्तरसभा’ ठाण्याच्या गडकरी रंगायतनसमोरील डॉ.मूस रोड वर होत आहे.ही सभा दणक्यात होणार असल्याने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या सभेच्या आयोजनासाठी मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महाराष्ट्र सैनिक कामाला लागले आहेत.

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाण्याच्या वेशीवरून तब्बल २०० चारचाकी आणि १००० दुचाकीची रॅली काढण्यात येणार आहे. तसेच मनसेच्या झेंड्याखाली पुन्हा एकदा तरुणाई एकवटत असल्याचे चित्र दिसत असुन मनसेवर उठसुठ तोंडसुख घेणाऱ्या आघाडीतील नेत्यांची उत्तरक्रिया राज ठाकरे कशी करतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र उत्तेरसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणाचे बारा वाजवणार हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: