खाजगी शस्त्र बाळगण्यासाठी परवानगी द्या, परमबीर सिंह विरोधात तक्रार करणाऱ्या अनुप डांगेंची मागणी

 

PI अनुप डांगे यांनी काही काळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री यांना एक पत्र लिहून परमबीर सिंग यांच्यावर अंडरवर्ल्डशी मैत्री आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अधचणीत अधिक वाद झाली होता. मारा आता अनुप डांगे यांनी थेट स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी मागितली आहे.

डांगे आपल्या तक्रारीत म्हणतात की,परमबीर सिंह यांच्या विरोधातील खटल्यातील साक्षीदारांना धमकावले जात आहे आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. अनुप डांगे यांच्या तक्रारीवरुन एसीबीकडून खुली चौकशी सुरू आहे. डांगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. गावदेवी पोलीस ठाण्यात असताना डांगे यांना जाणूनबुजून निलंबित करण्यात आल्याचं डांगे यांनी म्हटलं होतं.

अनुप डांगे सध्या पोलीस कंट्रोल रुमला तैनात आहेत त्यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आहे, मात्र ते पोलीस आयुक्तांच्या सूचनेप्रमाणेच वापरता येऊ शकतं. काही कामानिमित्त बाहेर गेल्यास ते सोबत नेता येत नाही. बाहेर गेल्यानंतर जीवाला धोका आहे यासाठी खाजगी पिस्तुल वापरण्याची अनुमती देण्याची विनंती डांगे यांनी केली आहे.

गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असताना अनुप डांगे यांनी काही काळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री यांना एक पत्र लिहून परमबीर सिंग यांच्यावर अंडरवर्ल्डशी मैत्री आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. अनुप डांगे यांच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये एका पबवर छापा टाकताना पबचे मालक जीतू निवलानी यांनी परमबीरसिंग यांच्याशी संबंध असल्याची धमकी दिली होती.

Team Global News Marathi: