पार्थ पवारांसाठी शिवसेना ‘मावळ’ची जागा सोडणार? संजय राऊत म्हणतायत की,

 

नागपूर | २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी २ वर्ष शिल्लक असले तरी महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आतापासून मोर्चाबंधांनी सुरु केली आहे . या महत्त्वाचं म्हणजे मावळ मतदारसंघ, ज्याठिकाणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे खासदार आहेत. या जागेवर पार्थ पवार यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी द्यावी. शिवसेनेने मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झाली आहे.

नागपूरच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. राऊत म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघात अद्याप कुणी अधिकृत भूमिका मांडली नाही. एखादा कार्यकर्ता भावनेच्या भरात बोलतो. मात्र याची अधिकृत चर्चा नाही. पार्थ पवार हे तरूण कार्यकर्ते आहेत. राजकारणात ते काम करतायेत.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पार्थ पवारांच्या राजकीय भवितव्याबाबत त्यांचा पक्ष विचार करेल. आमच्याकडे काही प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा होईल. त्यामुळे भविष्यात मावळमधून पार्थ पवार खासदार होतात का? हे पाहणं गरजेचे आहे. मात्र दुसरीकडे मावळ लोकसभा मतदार संघाचे आमदार श्रीरंग बारणे यांनी यावर थेट राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

Team Global News Marathi: