मुंबईसाठी पुढील १५ दिवस खूप महत्वाचे, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दोन नव्या ‘व्हेरिएन्ट्स’ची भीती

 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच आहे. महाराष्ट्रात सक्रिय प्रकरणे सुमारे २९ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. अशातच अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, येणारे १५ दिवस हे मुंबईसाठी खूप महत्वाचे असणार आहेत. मुंबई प्रशासनाकडून शहरात सातत्याने सावधानी बाळगली जात आहे.

१२ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार एकूण ३१ हजार ४७९ सक्रिय प्रकरणे होती. या आकड्यात वाढ झाली असून गुरुवारी हा आकडा ४३ हजार ७०१ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मुंबईत कोविड प्रकरणात ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई शहरात शुक्रवारी ८२३ नवीन रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरनंतरची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. आतापर्यंत शहरात कोरोना विषाणूचे ३ लाख १७ हजार ३१० रुग्ण आढळले असून ११ हजार ४३५ रूग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

 

अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की सुरुवातीच्या जीनोम सिक्वेंन्सिंगवरून असे निदर्शनास आले आहे की Sars-Cov-2 चे दोन म्यूटेटेड व्हेरिएन्ट्स अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात वेगाने पसरत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे एकाच कुटुंबातील बरेच रुग्ण संक्रमित होत आहेत, परंतु ते मदत करण्यास नकार देत आहेत.

Team Global News Marathi: