“भाजप-शिवसेना युतीसाठी बोलणी करणार; मात्र मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहणार”

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झालेले असताना तरी केंद्रीय मंत्री आणि रिपाई अध्यक्ष रामदास आठवले हे शिवसेना-भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा एकत्र यावे यासाठी अनेकदा प्रयत्न करताना दिसून आले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा त्यांनी शिसवेंम-भाजपा युतीवर भाष्य केले आहे. प्रबोधनकार ठाकरे हे बाबासाहेबांचे चांगले मित्र होते.

तसेच आमचे पॉलिटीकल निर्णय जरी वेगळे असले तरी एकमेकांबद्दल आदर आहे. तसेच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊ शकते का पाहावं लागेल. तसेच ५ वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहिले आणि शिवसेना भाजप एकत्र येतील अशा विचार करायला हवा मी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना बोलणार असं वक्तव्यं केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी आज पत्रकारांशी बोलताना केलं.

उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पद मिळालं आहे पुढच्यावेळी त्यांना अडीच वर्षे पद मिळायला हरकत नाही. अशा फॉर्म्युलाबाबत विचार करायला हरकत नाही. माझा प्रस्ताव अडीच अडीच वर्षे प्रस्ताव आहे. भाजपला ५० टक्के सत्ता द्यायची केंद्रात शिवसेनेच्या नेत्यांना द्यायची. जे.पी.नड्डा आणि अमित शाह याच्याशी बोलणार आहे तसेच ही युती करण्यासाठीची वेळ अजून गेली विचार करायला हरकत नसल्याचही आठवले यावेळी म्हणाले होते.

Team Global News Marathi: