आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघ सोडणाऱ्या सुनील शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर !

 

मुंबई | विधान परिषदेच्या जागेसाठी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीला मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणाऱ्या सुनिल शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पुरावे दिल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाल्या आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर नाराज होते. अखेरीस ऑडिओ प्रकरण रामदास कदम यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे.

तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजपला कागदपत्र पुरवणाऱ्या रामदास कदम यांना सेनेने डच्चू दिला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले ६ सदस्यांपैकी रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी मुदत समाप्त होत आहे. त्यामुळे या जागेसाठी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. अखेर शिवसेनेनं मुंबईतून विधान परिषदेसाठी सुनिल शिंदेंना उमेदवारी दिली आहे.

सुनिल शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सोडला होता. त्यावेळी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, असं आश्वासनं दिलं होतं. अखेर सेनेकडून सुनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात येत आहे. शिवसेनेनं एकाप्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्याला सन्मान करत पक्षासोबत निष्ठा न राखणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आगामी काळात रामदास कदम काय निर्णय घेता हे पाहण्याचे ठरणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने मुंबई मतदारसंघाकरिता दोन सदस्यांची मुदत दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी समाप्त होत असल्याने बृहन्मुंबईत दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ पासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: