एकगठ्ठा मतांसाठी भाजप सर्व विधानसभा क्षेत्रात गुजराती सेल थाटतंय |

 

मुंबई | शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका २०२२ पार पडणार आहेत. शिवसेनेसाठी त्यावेळी मराठी मतदार अत्यंत महत्वाचा ठरेल तर भाजपसाठी मुंबईतील गुजराती, जैन आणि मारवाडी मतदार महत्वाचा असणार आहेत. मुंबईतील गुजराती, जैन आणि मारवाडी मतदार हा भाजपला मतदान करणार यात कोणताही वाद नाही. तरीही भाजपने एकगठ्ठा मत मिळावी यासाठी मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघात गुजराती समाजाचे सेल स्थापल्याचं दिसून येतं आहे.

भारतीय जनता पक्ष एकाबाजूला राज्यातील २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे. त्यासाठी राज्यातील नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रा काढण्याचं नियोजन आहे.
त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे पदभार घेतलत्यानंतर आता जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत.

केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता त्यांनी पक्षबळकटीचं नियोजन केलं आहे. मुंबईपासून कोककणपर्यंत ही जन आशीर्वाद यात्रा निघणार आहे. नारायण राणेंच्या या यात्रेकडे सगळ्यांचाच लक्ष आहे. नारायण राणे हे १९ ऑगस्टपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रा सुरु करणार आहेत.

Team Global News Marathi: