राज्यात महापूर, महाराष्ट्र वाऱ्यावर; कुठे आहेत आमचे राज्यपाल? संजय राऊतांचा सवाल

राज्यात महापूर, महाराष्ट्र वाऱ्यावर; कुठे आहेत आमचे राज्यपाल? संजय राऊतांचा सवाल

महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात नाही, मंत्रीमंडळही अस्तित्वात नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, महाराष्ट्रात महापूर आलाय. राज्यात कॉलराचं थैमान आहे. अशा या परिस्थितीत कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे राज्यपाल कुठे आहेत असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यपालांच्या मार्गदर्शनाची आता खरी गरज असून, आता करा मार्गदर्शन; असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

दोन लोकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या 12 दिवस होऊन गेले आहेत, मात्र राज्यात काहीच सुरू झालेलं नसून उलट महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊन गेलाय अशी टीका राऊत यांनी केली आहे. राज्यात 100 पेक्षा अधिक लोकं महापुरात वाहून गेली आहे.  महाराष्ट्राच्या अनेक भागात कॉलेराचं थैमान आहे, लोकं मृत्यूमुखी पडत आहेत; इस्पितळात गोंधळ आहे असे राऊत यांनी म्हटले आहे.

शपथ घेतल्याला 12 दिवस होऊन गेले तरी महाराष्ट्रा सरकार काही स्थापन होत नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची सुनावणी ठेवली होती. यातले अनेक आमदार हे त्या बाजूला गेले आहेत, ते अपात्र ठरू शकतात. ज्यांच्यावर अपात्रतेची तलवार आहे त्यांना मंत्रीपदाची शपथ देणं हे घटनाबाह्यकृत्य आहे, हा राजद्रोह आणि राजकीय भ्रष्टाचार आहे. याची भीती असल्याने अजूनही शपथ घेण्यापासून त्यांना रोखलं गेलं आहे असे राऊत यांनी म्हटले.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या समर्थनाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, हे राजकीय समर्थन नाहीये. या देशात पहिल्यांदा एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहे.आदिवासी महिलेला हा बहुमान मिळत असल्याची देशवासीयांची भावना आहे.

शिवसेनेचे बहुतांश खासदार, आमदार, कार्यकर्ते आदिवासी क्षेत्रात काम करतात, यातील काही हे स्वत: आदिवासी आहे. आदिवासींच्या प्रती आदराची भावना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला की पक्षाचे मत हे मुर्मूंना द्यावे. अशा पदावर बसणाऱ्या व्यक्तीचा सन्मान व्हावा आणि योग्य व्यक्तीला पाठिंबा मिळावा  ही शिवसेनेची परंपरा आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: