गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा..!

गडचिरोली जिह्यातील कोसमी – कसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास पोलिसांना यश आलं आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

कसनेलीच्या जंगलात सी सिक्स्टी (C-60) कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या वर्षातील नक्षलवाद्यांच्या विरोधातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पोलीस अधीक्षक अनिकेत गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कल्वानिया व भाऊ ढोले यांच्या नेतृत्वाखाली C-60 चे जवान अभियान राबवित असताना अचानक नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्याच्या प्रतिउत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 5 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. त्यात 2 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: