अखेर इंदुरीकर महाराजांनी चूक सुधारली, राजेश टोपेंना समजूत काढण्यात आले यश !

 

जालना | कोरोना संसर्गाच्या पार्श्वश्वभूमीवर सर्वत्र युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यातच प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपण कोरोना लस घेणार नाही, असं जाहीर केलं होतं. पण, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना अखेरीस इंदुरीकर महाराज यांची समजूत काढण्यात यश आलं आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराज यांनी कोरोनाची लस घ्या, असं आवाहन करायला सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी नाशिकमध्ये कीर्तनाच्या दरम्यान आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे जाहीर करून टाकलं होतं. त्यानंतर ट्यंचाय्वर सर्व स्थरातून टीका करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपण इंदुरीकर महाराज यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. अखेरीस आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि इंदुरीकर महराजांची जालन्यात भेट झाली.

शनिवारी जालना जिल्ह्यातील वाकुळणी येथे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला राजेश टोपे यांनी हजेरी लावून भेट घेतली. या भेटीनंतर इंदुरीकर महाराजांनी कोरोना लस घेण्याचे कीर्तनातून आवाहन करणार असल्याचं वचन दिल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. एवढंच नाहीतर जालना येथील कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी प्रत्येकांनी लस घ्यावी असं आवाहन सुद्धा केलं आहे.

Team Global News Marathi: