पन्नास च्या पन्नास आमदार निवडून आणणार.. एक जरी पडला तर..एकनाथ शिंदेचे ओपन चॅलेंज

पन्नास च्या पन्नास आमदार निवडून आणणार.. एक जरी पडला तर..एकनाथ शिंदेचे ओपन चॅलेंज

ठाणे: मी मुख्यमंत्रीपदासाठी नव्हे तर माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत आलेल्या ५० आमदारांना न्याय मिळवून देण्यासाठी हा उठाव केल्याचे स्पष्ट करत, पुढील अडीच वर्षात यातील प्रत्येकाच्या मतदारसंघात विकासकामे करून त्यांना पुन्हा निवडून आणणारच असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निक्षून सांगितले.

सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या भव्य मेळावा आणि नागरी सत्कार सोहळ्यास सिल्लोडकर नागरिकांनी दिला उदंड प्रतिसाद दिला.

या सोहळ्यात अब्दुल सत्तार यांनी सत्तांतर करताना त्यांच्या मनातील भावना विषद केल्या.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले,सगळे विरोधक एकमुखाने सांगतायत की ५० मधला एकही आमदार निवडून येणार नाही. त्यांना मी सांगू इच्छितो, याअगोदरचे बंड वेगळे होते. त्या-त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आताचं बंड नसून उठाव होता. ५० मधला एकही आमदार पडला तर मी राजकारण सोडेन”, असा पुनरुच्चारत्यानी केला.

“ज्यावेळी बंड केलं, त्यावेळी मी राजकीय आत्महत्या केली, असं अनेक जण सांगत होते. पण मी नेमकं काय करतोय, याची मला पूर्णपणे जाणीव होती. बंडावेळी मी ३ दिवस आणि ३ रात्र झोपलो नव्हतो. माझ्या राजकीय करिअरची मला अजिबात भीती नव्हती, कारण मी ५० आमदारांच्या भवितव्याची चिंता केली होती, असंही शिंदे म्हणाले.

 

औरंगाबाद चे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय बहुमत नसलेल्या मविआ सरकारने बेकायदेशीरपणे घेतलेला असून नवीन सरकार सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून तो पुन्हा एकदा घेणार असल्याचे यासमयी जाहीर केले.

याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार, आमदार संदीपान भुमरे, आमदार प्रकाश अबिटकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार ज्ञानराज चौगुले आणि सिल्लोड सायगाव मतदारसंघातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: