कोरोनाच्या भीतीने अजित पवारांनी नाकारला कार्यकर्त्याने दिलेला पुष्पगुच्छ

सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवायला सुरवात केली आहे, त्यात कोरोनामुळे रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाचे नियम काटेकोडपणे पाळताना अनेकवेळा दिसून आले आहे, मात्र पूर्ण खबरदारी घेऊन सुद्धा अजितदादांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते मात्र यावर मत करून ते सुखरूप बाहेर आले होते.

कोरोनावर मात केल्यानंतर अजित पवार आणखीच खबरदारी घेताना अनेकवेळा दिसून आले होते. अशातच पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. अजित पवार पुण्यात म्हटले की कार्यकर्ते ओघाने ठरलेलेच असतात. कोरोना आढावा बैठकीपूर्वी विधान भवन आवारात ऑक्सिजन सिलेंडर, कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी चार चाकी वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम अगदी मोजक्या लोकांमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, याहीवेळी नेहमीप्रमाणे कार्यकर्ते अजित पवार यांची भेट घेण्यास आले होते.

यावेळी त्यातलाच एक कार्यकर्ता दादांना म्हणाला, दादा, तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचा आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, आरे बाबा, काही तरी नियम पाळा, कोणाकडून पुष्पगुच्छ आणला. त्याला कोरोना झाला असेल किंवा नाय काय माहिती? पण जरा काळजी घ्या…असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार बैठकीसाठी पुढे निघून गेले.

Team Global News Marathi: