शेतकऱ्यांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पूर्ण नुकसानभरपाई दिली जाईल-उद्धव ठाकरे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आश्वासन

मुंबई – राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून शासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि.११) स्पष्ट केले. तसेच कृषी कायद्याचे फायदे आणि तोटे विचारात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.


मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून शासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वाचा:  खवय्यांची इच्छा होणार पूर्ण; राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आजपासून पुन्हा सुरू

लोकल, जीम तूर्तास बंदच, आरे मध्ये मेट्रो कारशेड नाहीच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आपण मदत केली आहे. विदर्भात अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्यांना मदत करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. आता सतत पडणाऱ्या पावसाने ही पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी चिंता न करता निश्चित रहावे, शासन त्यांना त्यांची नुकसानभरपाई देईल अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.

जे विकेल तेच पिकेल ही योजना शासनाने राबविण्यास सुरुवात केली असून त्यादृष्टीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरु केली. तसेच  हमीभाव नाही तर पिकांना हमखास भाव मिळेल यादृष्टीने शेतकरी आणि बाजारपेठ यामध्ये सांगड घातली जाणार आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.  
राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसणार; हवामान खात्याचा अंदाज


केंद्र सरकारने जो कृषी कायदा आणला आहे त्याबाबत सर्व संबंधितांशी, शेतकरी संघटनांशी शासन संवाद साधत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की, कृषी कायद्याचे फायदे आणि तोटे विचारात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

दरम्यान, राज्य शासनाने कर्जमुक्ती, विक्रमी कापूस खरेदी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याचबरोबर अद्यापही कोरोना आपल्यातून गेला नाही त्यामुळे आतापर्यंत सर्व धार्मियांनी जसे सगळे सण समारंभ साधेपणाने साजरे केले तसेच येणारे नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सणही साधेपणाने साजरे करावेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: