शेतकरी, त्याचं कुटुंब शेतात राबल्यानं कोरोना संकटात अन्न धान्य पुरलं – दादा भुसे

 

महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पेरणीचा मोठा अनुभव आहे. व्यवस्थित पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, असं आव्हान कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले आहेत. महाविकास आघाडी सरकारचं धोरण शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे असंच आहे,असं देखील ते म्हणाले. ते शेतकरी कार्यशाळेत बोलत होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मार्दर्शन सुद्धा केले होते.

कोरोना संकटकाळात अन्न धान्य कमी पडल नाही कारण शेतकरी आणि त्याचं कुटुंब शेतात राबलं यामुळे ते शक्य झालं. गेल्या वर्षी खतांची मागणी वाढली होती. ९० हजार मेट्रिक टन युरियाचा स्टॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला. युरिया दोन दिवसात उपलब्ध होईल असं नियोजन करण्यात आलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या वर्षी कृषी सप्ताह साजरा केला होता. विकेल ते पिकेल ही थीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडली होती. बाहेरील व्यापारी अनेकदा शेतकऱ्यांचे पैसे घेऊन पोबारा करतात. कृषी कायद्यात काही बदल करणार आहोत.या बाबत कठोर पाऊल उचलणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शासन करणार आहोत. येणाऱ्या अधिवेशनात यावर निर्णय शक्य आहे असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: