शेतकऱ्याची मुलगी होणार गुलाबराव पाटील यांची सून, मंदिरात पार पडणार लग्नसोहळा

 

जळगाव | राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या घरीही लग्नसराई सुरु झाली आहे. पाटील यांच्या द्वितीय क्रमांकाच्या मुलाचा विक्रांतचा आज सोमवारी जळगाव जिल्ह्यात पाळधी या गावी विवाह पार पडणार आहे. मंत्राच्या घरचा विवाह असल्याने केवळ जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण राज्याच लक्ष या विवाह सोहळ्याकडे लागून राहिले आहे.

मात्र कॅबिनेट मंत्री म्हटलं की शाही विवाह होणार असेच प्रत्येकाला वाटल्या शिवाय राहणार नाही. मात्र गाव खेड्यापासून शेतकरी ते पानटपरी चालक राहिलेल्या गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात कोणताही बडेजाव न राखता साधे पणाने हा विवाह करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे पाटलांच्या घरी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी सून म्हणून येणार आहे.

एवढंच नव्हे तर आपल्या घरी येणारी सून ही मोठ्या राजकिय नेत्याची किंवा उद्योग पती परिवारातील न निवडता सर्व सामान्य शेतकरी परिवारातील शोधली आहे. गुलाबराव पाटील यांना राजकीय जीवनात ज्या गावाने आणि माणसांनी साथ दिली अशा चोपडा तालुक्यातील सन्फुले गावामधील भगवान भिका पाटील या शेतकऱ्याची बी इ कॉम्पुटर शिकलेली मुलगी प्रेरणा मंत्री महोदयांनी सून होत आहे.

मुलगा विक्रांत हा मेकॅनिकल इंजिनियर असून पाळधी गावातच त्याचे वर्क शॉप आहे, मंत्री गुलाबराव राजकारणात सक्रिय असले तरी त्यांच्या सून बाई कडील परिवार मात्र राजकारणात सक्रिय नाही. गुलाबराव पाटील यांची सून उच्च शिक्षित असली तरी एका सर्व सामान्य शेतकरी परिवार मधील असल्याने, गुलाबराव पाटील यांनी गाव खेड्यातील आपली नाळ या निमित्ताने जोडून ठेवली असल्याचं पाहायला मिळत आहे.

Team Global News Marathi: