माधुरी दीक्षितच्या सोबर अँड ब्यूटीफुल लुकने चाहते झाले घायाळ
‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित-नेने आता पूर्वीइतकी सिनेसृष्टीत सक्रिय नसली तरी तिचे लाखो चाहते तिची बातमी ठेवत असतात. सोशल मिडीयावर तिला फॉलो करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसते. इंस्टाग्राम वरही माधुरीचा जलवा कायम आहे.
‘आयुष्यात आणखी काय आनंद पाहिजे? चेहऱ्यावर सूर्यप्रकाश आणि आणि मंद वाऱ्यावर भुरभुरणारे केस आहेत…’ असे कॅप्शन देत माधुरीने तिचा एक ताजा फोटो तिच्या इन्स्टा पेजवर शेअर केला.
२१५ लाख फॉलोअर्स असणारी माधुरी आपले खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातले निवडक क्षण इथे शेअर करत असते. तिनं आपला एक सुरेख फोटो पोस्ट केला आहे. यात तिनं मरून रंगाचा फ्रॉक घातला असून, दोन्ही हात कमरेवर ठेवत स्टायलिश पोज दिली आहे.
याच रंगाची लिपस्टिक आणि हलकासा मेकअप तिला खुलवतो आहे. हातात अंगठी आणि साधेसे कानातले. तिच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असलेलं तिचं हसूही या फोटोत उठून दिसत आहे. त्यामुळे तिचा हा फोटो सध्या जोरदार चर्चेत आहे.