फडणवीस आज कोणता खुलासा करणार ? नीरज गुंडेंच्या ट्वीटमुळं वाढली उत्सुकता

 

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप लगावत एकच खळबळ उडवून दिली होती तसेच या प्रकरणात त्यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन नवा गोव्यस्पोट केला होता. तसेच या टीकेला फडणवीस यांनी सुद्धा दिवाळीनंतर फटाके फोडणार असा इशारा दिल होता.

त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज स्वतंत्र पत्रकार परिषद घेत नवे खुलासे करणार आहेत. अवघ्या एका तासाच्या अंतराने दोघांची पत्रकार परिषद होणार असून त्यातून काय नवे गौप्यस्फोट होणार आणि कोण अडचणीत येणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच नीरज गुंडे यांनी केलेल्या ट्वीटमुळं उत्सुकता आणखी वाढली आहे.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून केल्या जाणाऱ्या अनेक कारवाया बोगस आहेत. समीर वानखेडे हे खंडणी वसुलीसाठी खोटी प्रकरणे तयार करतात व मोठ्या घरातील लोकांना अडकवतात. त्यांना भारतीय जनता पक्षाचे काही लोक सामील आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. गेल्या महिनाभरात त्यांनी अनेक पुरावेही सादर केले होते. त्यामुळं एनसीबीला समीर वानखेडे यांना सहा प्रकरणांच्या तपासापासून दूर करावं लागलं.

तसेच या प्रकरणात नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचेही ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा आरोप केला होता. हे आरोप फडणवीस यांनी आधीच फेटाळले होते. उलट नवाब मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, असं सांगत त्यांनी मलिक यांच्या विरोधात पुरावे जाहीर करणार असल्याचं म्हटलं होतं. तर, नवाब मलिक यांनीही फडणवीसांचं आव्हान स्वीकारलं होतं.

 

Team Global News Marathi: