उद्या होणार फडणवीस -शिंदे यांचा शपथविधी ; ही आहे संभाव्य मंत्रिमंडळाची यादी

उद्या होणार फडणवीस -शिंदे यांचा शपथविधी ; ही आहे संभाव्य मंत्रिमंडळाची यादी

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा दिल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आलाय. उद्या भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती आहे. तर 1 जुलैला देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी होणार असल्याचं सूत्र सांगतात. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होतं. यानंतर वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना मुंबईत बोलावण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या टीका टिप्पणी आणि आरोपांमुळे बंडखोरांनी वेगळी वाट पकडली. आता 1 जुलैला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे गट सरकार स्थापन करणार असून सत्तेचा फॉर्म्यूला देखील तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हाच सत्तेचा फॉर्म्यूला मीडियाच्या हाती लागलाय.

 

बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून सरकार बनवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी सत्तेचा फॉर्म्यूला देखील बनला असल्याचं सूत्रांच्या माध्यमातून समोर आलंय. तो फॉर्म्यूला काय आहे. हे जाणून घ्या..

सत्तेच्या नव्या फॉर्म्यूल्यात शिंदे गटाला काय?

शिंदे गटाला भाजपची ऑफर
उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिदेंना
आठ आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद
पाच आमदारांना राज्य मंत्रीपद

सत्तेच्या नव्या फॉर्म्यूल्यात भाजपला काय?

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद
भाजपचे 28 आमदार मंत्री बनतील
अपक्ष आमदारांनाही मंत्री पदे

भाजप आणि एकनाथ शिंदे गटात झालेल्या चर्चेनुसार, दर 6 आमदारांमागदे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीप पद दिले जाऊ शकते. मात्र, खाते वाटपाचे हे सूत्र अंतिम झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपकडे या सूत्रानुसार 28 मंत्रीपदे मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याची माहिती समोर येत आहे

भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या मंत्रिमंडळात यांची लागू शकते वर्णी

कॅबिनेट मंत्री

देवेंद्र फडणवीस

चंद्रकात पाटील

सुधीर मुनगंटीवार

गिरीश महाजन

आशिष शेलार

प्रवीण दरेकर

प्रसाद लाड

मंगलप्रभात लोढा

रवींद्र चव्हाण

चंद्रशेखर बावनकुळे

विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख

गणेश नाईक

राधाकृष्ण विखे पाटील

संभाजी पाटील निलंगेकर

राणा जगजितसिंह पाटील

संजय कुटे

डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित

सुरेश खाडे

जयकुमार रावल

अतुल सावे

देवयानी फरांदे

रणधीर सावरकर

जयकुमार गोरे

विनय कोरे, जनसुराज्य

परिणय फुके

हे राज्यमंत्री होण्याची शक्यता

नितेश राणे

प्रशांत ठाकूर

मदन येरावार

महेश लांडगे किंवा राहुल कुल

निलय नाईक

गोपीचंद पडळकर

एकनाथ शिंदे गटाकडून यांची नावे असू शकतात

कॅबिनेट मंत्री

एकनाथ शिंदे

गुलाबराव पाटील

उदय सामंत

दादा भुसे

अब्दुल सत्तार

संजय राठोड

शंभूराज देसाई

बच्चू कडू

तानाजी सावंत

दीपक केसरकर

>> राज्यमंत्री

संदीपान भूमरे

संजय शिरसाट

भरत गोगावले

ग्लोबल न्युज नेटवर्क: