“फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात, शरद पवार ज्येष्ठ पण श्रेष्ठ नाहीत”

 

पाच राज्यात विधसनाभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला असून या विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपा कार्यालयात कार्यक्रमतचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमादरमान्य भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाष्य करत नवा वाद अंगावर ओढवून घेतला आहे. शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. पण श्रेष्ठ नाहीत. देवेंद्र फडणवीस हे असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात, अशी घणाघाती टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

पडळकर मुंबईत भाजपाच्या प्रदेशकार्यालया बाहेर आयोजित चार राज्यांच्या निवडणुकीतील यशाच्या सेलिब्रेशनवेळी बोलत होते. गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत मुंबईत भाजपाकडून करण्यात आलं. यावेळी पडळकरांनी फडणवीसांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना थेट शरद पवारांवर निशाणा साधला.

“शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. पण श्रेष्ठ नाहीत. काही केलं तरी मीच केलं. माझ्यापेक्षा पुढे कुणी जाता कामा नये असे शरद पवार आहेत. देवेंद्रजी १०-२० पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे. फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा आणि राष्ट्राच्या विरोधातील भूमिका शरद पवारांकडे आहे असले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आहे”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

 

Team Global News Marathi: