कारखानदारांनी दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकला,- सदाभाऊ खोत

 

राज्या-राज्यातील सहकार खात्यावर वचक ठेवण्यासाठी केंद्रीय सहकार खात्याची निर्मिती करण्यात आलेली असून या खाटायव्हर प्रमुख म्हणून गृहमंत्री अमित शहा यांची नेमणूक कारण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यातील 55 सहकारी साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली. हे कारखाने काही खासगी कंपन्यांकडून कवडीमोल पैशातून खरेदी करण्यात आले. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मेधा पाटकर आणि अन्य नेते, समाजसेवकांनी आझाद मैदानातून कारवाईची मागणी केली होती. मात्र, शेकडो कोरी रुपये किमतीचे साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले गेल्याचा आरोप सदाभाऊ यांनी आज मुंबईत केला आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे व्यवहार राज्य शिखर बँकेकडून झाले होते. शेकडो कोटी रुपये किमतीच्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री कवडीमोल भावानं झाली. या कारखानदारांनी दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकला. यात राज्याचे तब्बल १२०० कोटी रुपयांचे भाग भांडवल अडकलं आहे. हे कारखाने पुन्हा सहकारी होणं गरजेचं आहे. या कारखान्यासंदर्भात झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Team Global News Marathi: