बार्शीच्या मयूर फरताडेला ‘या’ कारणामुळे दिले फेसबुक ने 22 लाखांचे बक्षीस

बार्शी  – सोशल मीडियाला ऑप्शन नाही. त्याचा वापर म्हणजे बंधनकारकच अशी अवस्था झाली आहे. पण बार्शीच्या मयूर फरताडे याने त्याची आवड जोपासत यातून तब्बल 22 लाखाची कमाईही केली आहे. जवळपास सर्वजण वापरत असलेल्या इन्स्टाग्रामची सुरक्षितता कशी धोक्यात आहे? याचा डेमोच फेसबुकला पाठवला होता. त्याच्या या संशोधनामुळे फेसबुकलाही चूक लक्षात आली आहे. इन्स्टाग्राममधील बग या एररमुळे वापर करणाऱ्यांची प्रायव्हसी ही धोक्यात येत होती. नेमकी हीच बाब मयूरने समोर आणली आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होते आहे.

‘मयूर’ने पटकावले फेसबुककडून 22 लाखाचे बक्षीसकोण आहे मयूर?

मयूर फरताडे हा 21 वर्षीय तरुण मूळचा बार्शी येथिल आहे. शिक्षणासाठी तो कोल्हापूरला असला तरी सध्याच्या लॉकडाऊनमुळे तो घरीच होता. माध्यमिक शिक्षण घेत असल्यापासून त्याला सोशल मीडियाची केवळ आवडच  नाहीतर त्या संबंधी कुणाला काही अडचणी आल्या तरी, त्या सोडवणू देण्याची त्याला आवड आहे. आपली आवड जोपासत या लॉकडाऊनमध्ये त्याने फेसबुकचे आवाहन स्वीकारले.

फेसबुकने सोशल मीडियातील वापरात असलेल्या अॅपमध्ये हॅकर्सचे प्रमाण वाढत असल्याने बग समोर आणण्याचे आवाहन केले होते. दोन आठवडे प्रचंड अभ्यास करून मयूने इन्स्टाग्राममध्ये बग हा असा प्रॉब्लेम आहे. ज्यामधून कोणाचेही खासगी फोटो, माहिती लीक करता येत होती. नेमका प्रकार घडतो कसा हा डेमो मयूरने फेसबुकला निदर्शनास आणून दिला. ही महत्त्वाची बाब असल्याने फेसबुकनेही मयूरच्या संशोधनाचे कौतुक केले आहे. शिवाय त्याला बक्षीस म्हणून 22 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये फेसबुककडून त्याला यासंदर्भात पत्रही आले आहे.

‘या उद्देशाने करा सोशल मीडियाचा वापर’सद्यस्थितीत केवळ टाइमपास म्हणून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअ‌ॅप पाहिले जाते. शिवाय वेळेचे भानही तरुणांना राहत नाही. केवळ नियमित वेळी त्याचा वापर करून यामधून पैसा कसा कमवता येईल, याकडे तरुणांनी लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा वेळ निघून गेल्यावर न भरून निघणारे नुकसान सहन करण्याची नामुष्की येत असल्याचेही मयूरने सांगितले आहे.

दोन महिन्याच्या मेहनीतून 22 लाखाची कमाई

मयूर फरताडे याचे वय 21 वर्ष आहे. तो कोल्हापूरला कॉम्पुटर सायन्सचे शिक्षण घेत आहे. पण सध्या लॉकडाऊनमुळे तो बार्शीतच वास्तव्यास आहे. फेसबुकने दिलेले आवाहन त्याने घेतले आणि पूर्णही केले. याकरिता दोन महिने प्रचंड मेहनत केली असून त्याच्या या परिश्रमांनातर त्याची दखल थेट फेसबुकने घेतली आहे. शिवाय 22 लाख रुपये देण्याचेही जाहीर केले आहे.

लॉक डाऊन मध्ये पुरेसा मोकळा वेळ होता. काहीतरी नवीन शिकायचे म्हणूनवेगवेगळ्या स्विक्युरी रिसोसेर्सेच चे लिखाण वाचत होतो. त्यातूनच मला इन्स्टाग्रामवर बग शोधण्याचे प्रोत्साहन मिळाले. दोन आठवडे मी नवीन फीचर्स बघून वेब ऍप आणि अँड्रॉइड ऍप वर टेस्ट करत होतो. त्यात मला हा बग सापडला. फेसबुक चा बग bounty प्रोग्रॅम आहे. त्यामध्ये त्यामध्ये सिक्युरिटी रिसर्चेस पार्टीसिपेट करू शकतात. ईथे जाऊन मी हा बग रिपोर्ट केला.

मयूर फरताडे

ग्लोबल न्युज नेटवर्क: