वडेट्टीवार यांची आघाडी सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा मोर्चा संघटनांची मागणी

वडेट्टीवार यांची आघाडी सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा मोर्चा संघटनांची मागणी

मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत होते. त्यात मदत आणि पुर्नविकास मंत्री यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर केलेल्या भाष्यामुळे त्यांनी एक नवा वाद अंगावर ओढावून घेतला होता. त्यामुळे आक्रमक झालेल्या मराठा समाजाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीवर निर्णय येऊ पर्यंत शासकीय नोकरभरती करू नका अशी विनंती मराठा मोर्चा संघटनांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरु करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. ओबीसींसह इतर मुलांचे वय वाढत चालले आहे, त्यांना वेठीस धरायला नको असे मत वडेट्टीवार यांनी बोलून दाखविले होते.

‘मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतोय. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको असा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

ग्लोबल न्युज नेटवर्क: