Exit Polls : महाराष्ट्राचा महाकौल, जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये महायुतीचा वरचष्मा

मुंबई । पावसाच्या सावटाखाली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर पाऊस आणि काही किरकोळ घटनांमुळे महाराष्ट्राचा मतदानाचा टक्का घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता सत्ता कुणाची येणार याचीच अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. दुसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीने पूर्ण जोर लावल्याचं दिसून आलं. तर महायुतीला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीनेही पूर्ण ताकद पणाला लावली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडताच विविध संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. यात जवळपास सर्वच पोलमध्ये महायुतीला जनमताचा कौल मिळाला असल्याचं चित्र आहे. परंतु प्रत्यक्ष निकालाला 24 ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महाराष्ट्रात आज एकूण २८८ विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. बहुमतासाठी १४५ जागांची आवश्यकता असेल. राज्यातील 3239  उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती 24 ऑक्टोबर म्हणजेच निकालाच्या दिवसाची. यावेळेसच्या मतदानात शहरी भागातील मतदारांचा निरुत्साह स्पष्टपणे दिसून आला. याउलट ग्रामीण भागातील मतदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसते. 

राज्यात एकूण 3239 उमेदवार रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 288 मतदारसंघात एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. सर्वात जास्त 246 उमेदवार पुणे जिल्ह्यातून, तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार आहेत.

असे आहेत एक्झिट पोल…

आघाडीनिहाय एक्झिट पोल्स 2019
भाजप+शिवसेना मित्रपक्षांची महायुती

काँग्रेस+राष्ट्रवादी मित्रपक्षांची महाआघाडी

इतर

न्यूज 18 – IPSOS

243 41 4

टाइम्स नाऊ
230 48 10
इंडिया टुडे – माय अॅक्सिस

166-194 72 -90 22-34

रिपब्लिक जन की बात

216-230  52-598-12

एबीपी – सी व्होटर

192-216 55-81 4-21

टीव्ही 9 – सिसेरो

197 75  16
न्यूज एक्स – पोलस्ट्रॅट

188-20074-896-10

(या सर्व एक्झिट पोलसाठी संबंधित संस्थांनी सर्व्हे केलेले आहेत.)

असे होते २०१४चे विधानसभा निवडणूक निकाल

एकूण जागा – 288 व मतांची टक्केवारी
भाजप– 122 (27.81%)
शिवसेना– 63 (19.35%)
काँग्रेस– 42 (17.95%)
राष्ट्रवादी- 41 (17.24%)
सीपीआय-एम – 1 (0.39%)
मनसे– 1 (3.15%)
एआयएमआयएम– 2 (0.93%)
समाजवादी पार्टी– 1 (0.17%)
राष्ट्रीय समाज पक्ष– 1 (0.49%)
अपक्ष– 7 (4.71%)
बहुजन विकास अघाडी– 3 (0.62%)
भारिपा बहुजन महासंघ– 1 (0.89%)

मतदानाचं प्रमाण
2004 – 63.44टक्के
2009 – 59.50टक्के
2014 – 63.08टक्के

लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातील विजयी जागा
भाजप 23
शिवसेना 18
काँग्रेस 1
राष्ट्रवादी 4
एमआयएम 1
अन्य 1

महाराष्ट्राचे सामाजिक अंतरंग

एकूण लोकसंख्या- ११ कोटी २३ लाख (सुमारे)

हिंदू – 8.97 कोटी (79.82टक्के)
मुस्लिम– 1.29 कोटी (11.54टक्के)
ख्रिश्चन– 10.80 लाख (0.96टक्के)
शीख – 2 लाख 23 हजार
बौद्ध – 65.31 लाख (5.81टक्के)
जैन– 14.00 लाख (1.24टक्के)
अन्य – 1,78,965 (सर्व आकडे विविध स्रोतांद्वारे अंदाजित)

जातीनिहाय लोकसंख्या- (१९३१च्या जातीय जनगणनेआधारे अंदाजित)

मराठा- 30 टक्के
ब्राह्मण व उच्च जाती- 10 टक्के
मुस्लिम-9टक्के
कुणबी- 13 टक्के
विविध ओबीसी- 15 टक्के
अनुसूचित जाती व जमाती आणि अन्य प्रवर्ग-23 टक्के

२०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकूण मतदार- ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६

ग्लोबल न्युज नेटवर्क: