माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन !

मुंबई : संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात मोठया संख्याने आणि झपाट्याने रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. त्यात अनेकांना आपला प्राण सुद्धा गमवावा लागला आहे. त्यातच कोरोनामुळे काँग्रेस पक्षाचे माजी मुंबई अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड याचे वडील माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे आज सकाळी १०:०० वाजता निधन झाले आहे.

माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. पण बुधवारी सकाळी उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धाजली अर्पण केली आहे.

एकनाथ गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष राहिलेल्या एकनाथ गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले होते. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा एकनाथ गायकवाड यांनी पराभव केला होता. दक्षिण मध्य मुंबईतून दोन वेळा ते निवडून आले होते. नंतर मात्र शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता.

Team Global News Marathi: