गिरीश महाजन यांच्या विरोधात सीडी आणि पेनड्राईव्ह’चे पुरावे योग्यवेळी समोर आणू – ललवानी
भाजपा नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात BHR पतसंस्था घोटाळा प्रकरणी गंभीर आरोप लागवण्यात आले होते. महाजन यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या माद्यमातून BHR पतसंस्थेच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या होत्या.
या खरेदी प्रकरणी आपल्याकडे सीडी आणि पेनड्राईव्ह आहे आणि ते योग्य वेळी आपण सर्वांसमोर आणू ,” असा आरोप माजी नगराध्यक्ष पारस लालवाणी यांनी केला आहे. लालवाणी यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन महाजन यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लगावले होते.
त्यामुळे संकटमोचक नेते नावाने ओळखले जाणारे गिरीश महाजन सध्या अडचणी येण्याची चिन्हं दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी शिक्षण संस्थाचालकाला धमकावल्याप्रकरणी महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची चर्चा सुरू असताना बीएचआर पतसंस्था घोटाळ्यात महाजन यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांच्यावर विविध आरोप केले आहेत.
ललवाणी म्हणाले, “बीएचआर पतसंस्थेच्या जमिनी गिरीश महाजन यांनी अतिशय कमी दरात आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खरेदी केल्या. अनेक संस्था बळकावण्यासाठीही संबंधित संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर त्यांनी पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना त्रास दिला. पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करण्याचा पॅटर्न गिरीश महाजन यांनीच राज्यभरात पसरवला असे बोलून दाखविले.