बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर सर्वजण करतात रासलीला, मी काही करायला गेले तर लगेच कॅरेक्टर ढीला?’

‘बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर सर्वजण करतात रासलीला, मी काही करायला गेले तर लगेच कॅरेक्टर ढीला?’

 

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातराजकारणाचे वातावरण चांगलेच तापले आहे. हनुमान चालिसाच्या पठणावरून राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत वाद झाला आहे. दुसरीकडे, रात्री उशिरा राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी आलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.त्याच्या एक दिवसापूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवरही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने जनतेच्या मनात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भावना निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, असे झाले तर महाराष्ट्र पेटेल. दरम्यान, राणा दाम्पत्याला वांद्रे हॉलिडे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

 

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर सर्व जण रासलीला करतात आणि मी काही करायला गेले तर कॅरेक्टर ढिला? असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर काही वेळेतच त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.

ट्विटमध्ये अमृता फडणवीस म्हणतात, हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर इथे सर्वजण करतात रासलीला आणि मी काही करायला गेले तर लगेच कॅरेक्टर ढीला? असा सवाल त्यांनी केला आहे.

बाळा साहेब के नाम पे करते सभी अब रास लीला है,
मैं करूँ तो साला, character ढीला है !#Maharashtra https://t.co/3gHdDk86y2

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 24, 2022

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत भाजप आणि राणा दाम्पत्याला उद्देशून म्हणाले होते, शिवसेनेच्या नादाला लागाल तर २० फूट खाली गाडले जाल अशी टीका संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा केली जाते, पण त्याची साधी दखलंही घेतली जात नाही. सरकार सोयीस्करपणे गप्प का आहे, असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून केला होता. आता अमृता फडणवीस यांनी ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?’असे ट्विट करून सरकारला प्रश्न विचारला होता. त्यानंतर काही वेळेतच हे ट्विट अमृतांनी डिलीट केले होते.

सध्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अमरावती जिल्ह्यातील वडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्या ‘मातोश्री’ समोर हनुमान चालीसा पठण आंदोलनामुळे महाराष्ट्राती राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात या वादात आता अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे.

नवनीत आणि रवी राणा या दांपत्याविरोधात भादंवि कलम 124 ‘अ’नुसार राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: