दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येतात याला घेरणं म्हणत नाही – नवाब मलिक

मुंबई : विरार दुर्घटनेवरून विरोधककाणी आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरूनच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दरेकरांना टोला लगावला आहे. दरेकर जॅकेट घालून आरशासमोर पाहून टीव्हीसमोर येतात. मी कसा दिसतो असं कॅमेरामनला विचारतात. याला सरकारला घेरणं म्हणत नाहीत, अशी टीका मलिक यांनी केली आहे.

राज्यात फायर ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही रुग्णालयाला परवानगी देण्यात येत नाही. खासगी रुग्णालयात कधी कधी एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागते. अशावेळी सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही, असं सांगतानाच सरकारला कोण घेरतंय हा प्रश्नच आहे असे म्हणता मलिक यांनी दरेकरांना टोला लगावला होता.

पुढे बोलताना त्यांनी दरेकरांना जोरदार टिकलेली होती. ते म्हणाले की, येड्यासारखे लोक बोलत आहेत. उठसूट जॅकेट घालून कॅमेऱ्यासमोर येत आहेत. प्रतिक्रिया देण्यापूर्वी मी कसा दिसतो असं कॅमेरामनला विचारतात. तसेच विरोधी पक्षनेते कार्यालयात बसून फक्त टीव्हीवर प्रतिक्रिया देण्याचे काम करतात.

Team Global News Marathi: