अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना.. आशिष शेलारांचा सेनेला टोला

भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका शिवसेनेने केली होती. त्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेने नागपूरमध्ये जाऊन हिंदुत्वाचा क्लास लावावा, असा टोला लगावतानाच अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन झाली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

शेलार आज प्रसार माध्यमांशी बोलताना सेनेचा चांगलाच समाचार घेतला होता. शिवसेनेने हिंदुत्वावर भाष्य करू नये. हिंदुत्वाचा खरा क्लास लावावा. नागपूरच्या कार्यालयात तुन्ही नेहमी जात असता. आताही जा आणि हिंदुत्व समजून घ्या, असा टोला शेलार यांनी लगावला.

शरजील उस्मानी याला पळवून लावण्यात आलं आहे. त्याला पळवून लावण्यास कोणी मदत केली. सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा हात आहे. एल्गारची पार्श्वभूमी माहीत असतानाही एल्गार परिषदेला परवानगी का देण्यात आली? असा सवाल करतानाच भाजपच्या आंदोलनानंतर सरकारला दोन दिवसाने जाग आली असा टोला त्यांनी आघाडी सरकरला लगावला होता.

Team Global News Marathi: