शिवसेनेच्या आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी धोक्यात वाचा सविस्तर बातमी
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शिवसेना आमदार लताबाई चंद्रकांत सोनावणे यांची आमदारकी धोक्यात आलेली आहे. आमदार सोनावणे यांचे टोकरे कोळी अनुसुचित जमातीचा उल्लेख असणारे प्रमाणपत्र नंदुरबार येथील अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरविले आहे. याबाबत समितीने ४ नोवेंबर रोजी आदेश काढले असल्याची माहिती माजी आमदार जगदीश वळवी यांनी दिलेली आहे. त्यामुळे सोनावणे यांचे आमदारकी पद धोक्यात आलेले आहे.
चोपडा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. या ठिकाणाहून लताबाई चंद्रकांत सोनवणे या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी लताबाई यांच्या अनुसूचित जमातीचा दावा करणाऱ्या प्रमाणपत्राबद्दल उपसंचालक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्याकडे तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर समितीसमोर सुनावणी करण्यात आली. मात्र या समितीने काहीही निकाल न वळवी यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायलयाने संबंधित त्रिसदस्यीय समितीला लवकरात लवकर आदेश द्या, असे खडसावले होते.