‘इस्लाम हा धर्मच नाही’, नाशिकमध्ये कालिचरण महाराजांचे वादग्रस्त विधान !

 

महाराज कालिचरण यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी नाशिकमध्ये इस्लाम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले असून यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राजकीय तापले होते. अनेकांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना अटकही करण्यात आली होती. आज पुन्हा त्यांनी इस्लाम धर्माबाबत वादग्रस्त विधान केले आहे. कालीचरण महाराज नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी ‘इस्लाम धर्मच नाही’ असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कालिचरण महाराज नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी नाशिक येथील ग्रामदैवत असलेल्या भद्रकाली देवीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी ते म्हणाले कि, हिंदूंची पाच लाख प्रार्थना स्थळे फोडण्यात आली आहेत. ती परत मिळवणे गरजेचे आहे. यासाठी मोदी, शहा, योगी देशाला तारतील, असेही ते म्हणाले. राज ठाकरेंच्या भूमिकेवर स्पष्टीकरण देताना म्हणाले कि, हिंदुत्वासाठी जे काही होईल त्याचा सन्मानचं करण्यात येईल. तसेच शरद पवारांचे वैयक्तिक आयुष्य आहे. पण सोशल मीडियामुळे सर्वच जण बघत आहेत, असं ते म्हणाले.

इस्लाम हा धर्मच नाही.. यावेळी इस्लाम धर्माविषयी बोलताना ते म्हणाले कि, ‘इस्लाम हा धर्मच नाही..हा वाद धर्म विरुद्ध अधर्म आहे’, हिंदूंना जर कुटुंबासह धर्माचं संरक्षण पाहिजे तर हिरीरीने राजकारणात लक्ष द्यायला हवं. मुस्लिमांचे 100 टक्के मतदान हे फक्त इस्लामसाठी होतं. जर आई-बहिणींना वाचवायच असेल तर ते फक्त राजनीतीनेच वाचविता येऊ शकतं. म्हणून मी मोदींच्या कामावर प्रसन्न आहे, जो हिंदू हिताची गोष्ट करेल त्याला जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Team Global News Marathi: