पर्यावरण मंत्री पत्री पुलासाठी दोनदा आले मात्र.. मनसे आमदार राजू पाटील यांचा मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला

प्रदूषण रोखण्यासाठी मागच्या १ दिवसांपासून नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसून आंदोलन करत आहे. आज लाखो लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. पत्री पुलासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे २ वेळा कल्याणमध्ये येतात. मात्र त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन मार्ग काढला पाहिजे ही विनंती, सरकारचे लक्ष नाही. कल्याण डोंबिवलीकरांवर कधी कृपादृष्टी होईल हे आम्हाला माहीत नाही,” असे विधान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले आहेत.

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी नदी पात्रता उतरून आंदोलन सुरु केले आहे. नदी प्रदूषण रोखण्यावर जोर्पयत ठोस तोडगा काढला जात नाही. तोर्पयत आंदोलन मागे घेतले जाणार नाही याच मुद्द्यावर नितीन निकम ठाम आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी पत्रकार माध्यमांशी संवाद सोडताना त्यांनी राज्य सरकार आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला होता.

पुढे आमदार राजु पाटील म्हणाले की, नदी प्रदूषणाचा मुद्दा हा पर्यावरणाशी संबंधित आहे. प्रदूषणप्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष द्यावे, याकडे राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे. आदित्य ठाकरे पत्री पूलासाठी कल्याणमध्ये दोनदा आले होते. त्यांनी कल्याणमध्ये येऊन नदी प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.

Team Global News Marathi: