रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच विधानभवनात प्रवेश – नाना पटोले

रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच विधानभवनात प्रवेश – नाना पटोले

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन दिनांक ७ व ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याची खात्री केल्यानंतरच विधानभवनामध्ये प्रवेश देण्यात येईल. आज यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होऊन सर्व व्यवस्थांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.

सभागृह तसेच विधानभवन इमारत येथे सर्व खबरदारीच्या उपाययोजना कार्यान्वित करण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सोमवार‍ दिनांक ७ सप्टेंबर, २०२० पासून विधानभवन, मुंबई येथे सुरु होणाऱ्या विधानमंडळाच्या अधिवेशनाकरिता उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी कोरोना विषाणू संसर्ग नसल्याबाबतचा अधिवेशनाच्या अगदी लगतपूर्वीचा अधिकृत प्रयोगशाळेचा अहवाल विधानमंडळ सचिवालयाकडे सादर करणे आवश्यक राहिल असे दिनांक २५ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: