एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार, पुन्हा आमचंच सरकार महाराष्ट्रात येणार

 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली अपमानास्पद विधाने, सीमावादप्रश्न, महागाईल, बेरोजगारी यांसह अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तीनही पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे नेते मोर्चात होते. या मोर्चाला संबोधित करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. या नेत्यांच्या टीकेचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदच्युत केले आहे. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. सरकार टिकणार नाही, या दाव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांना स्वतःचे सरकार टिकवता आले नाही, त्यांच्या नाकाच्या खालून आम्ही हे सरकार घेऊन गेलो.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, हे सरकार टिकणार. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आणि त्यांच्याच नेतृत्वात पुढील निवडणुका लढणार. इतकेच नव्हे तर आमचेच सरकार येणार, तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद हा हे सरकार आल्यावर सुरू झालेला नाही. गेली ६० वर्ष हा वाद आहे. तसेच वारंवार या लोकांनी राज्यात सरकार चालवले. मात्र, यावर काहीही केलेले नाही, ही गोष्ट हे तीन पक्ष विसरत आहेत, असे सांगत आता कोणत्या तोंडाने सांगत आहेत, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Team Global News Marathi: