एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत पोहोचणार

 

एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदार महाराष्ट्रात कधी परतणार याची प्रतीक्षा होती. याबाबत एकनाथ शिंदे यांनी स्वत: माहिती देत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याचं सांगितलं. गुवाहाटीताल कामाख्या देवीच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदे आज गेले होते, तेथे त्यांनी ही माहिती दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बहुमत सिद्ध करण्याच्या आशयाचं पत्र महाविकास आघाडीला दिल्यानंतर शिंदे गटाच्या निर्णयाकडे सर्वाचं लक्ष होतं. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, सर्व आमदारांना घेऊन आम्ही बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईमध्ये पोहोचणार आहोत. सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण करु.

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आधीच इशारा दिला आहे. त्यात इतर शिवसेनेचे नेते देखील आक्रमक दिसत आहेत. अशा परिस्थितीत बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर परिस्थिती तणावाची असू शकते. त्यामुळे बंडखोर आमदारांना केंद्राची सुरक्षा पुरवली जाते का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दोन्ही काँग्रेसकडून त्रास होत असल्याचा आरोप राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं असं मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरूवारी) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला दिले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी गुरूवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे.

Team Global News Marathi: