एकनाथ शिंदे हे तळागाळातील नेते , पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

एकनाथ शिंदे हे ग्रासरुट लेवल लीडर, पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : शिवसेना आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या सत्ता संघर्षाचा शेवट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली . तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र, मी कोणतेही मंत्रीपद घेणार नाही. मी सत्तेतच्या बाहेर असेल. पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचं आणि बाळसााहेबांनी मांडलेलं हिंदुत्व. भाजप हिंदुत्व मांडतय. मोदींनी जे व्हिजन दाखवलं ते पुढे नेणार. काम करेल, असं फडणवीस यांनी जाहीर केलं. मात्र, यानंतर भाजप पक्षाने त्यांना उप मुख्यमंत्री विराजमान होण्याची विनंती केली.

मुंबई : महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे(Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) विराजमान झाले आहेत. मुबईच्या राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. मी सत्तेतच्या बाहेर असेल असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्यास नकार दिला होता. अखेर पक्षाचा आदेश आला आणि फडणवीस उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार झाले. शपथ विधी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी ट्विट करत फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनाही शुभेच्छा दिल्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट

देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडे सरकारचे नेतृत्व करण्याचा दांडगा अनुभव आणि कौशल्य आहे. ते निश्चितच महाराष्ट्राला विकासाच्या प्रगती पथावर नेतील असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदन. शिंदे हे ग्रासरुट लेव्हलेचे नेते आहेत. ते निश्चितच महाराष्ट्राचा विकास करतील असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

शिवसेना आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या सत्ता संघर्षाचा शेवट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली . तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र, मी कोणतेही मंत्रीपद घेणार नाही. मी सत्तेतच्या बाहेर असेल. पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचं आणि बाळसााहेबांनी मांडलेलं हिंदुत्व. भाजप हिंदुत्व मांडतय. मोदींनी जे व्हिजन दाखवलं ते पुढे नेणार. काम करेल, असं फडणवीस यांनी जाहीर केलं. मात्र, यानंतर भाजप पक्षाने त्यांना उप मुख्यमंत्री विराजमान होण्याची विनंती केली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (jp nadda) यांनी ट्विट करून व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच फडणवीस उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं जेपी नड्डा यांनी जाहीर केलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे फडणवीस आणि नड्डा यांच्यात विसंवाद असल्याचं दिसून आलं.

भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं असा आग्रह केला. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना दोन फोन केले आणि सरकारमध्ये सहभागी होण्यास सांगितलं. त्यानंतर अखेर फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार झाले.

प्रामाणिक कार्यकर्ता के नाते पार्टी के आदेश का मैं पालन करता हूँ. जिस पार्टी ने मुझे सर्वोच्च पद तक पहुँचाया, उसका आदेश मेरे लिए सर्वोपरि है.

पक्षादेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेच फडणवीस यांनी एक ट्वीट करत पक्षाचा आदेश मला शिरोधार्य असल्याचे ट्विट केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: