एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात संघाच्या वाद घराणेशाहीवर गेला

 

माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्यातील वाद आता विकोपाला जात आहे. मागच्या काही दिवसांपासून गिरीष महाजन आणि एकनाथ खडसे एकमेकांवर जोरदार प्रहार करताना दिसून येत आहे. हा वाद जळगाव दुध संघावरून होत आता घराणेशाहीवर गेला आहे. गिरीष महाजन यांनी एकनाथ खडसेंवर घराणेशाहीवरून टीका केली होती. यावर आता एकनाथ खडसेंनी महाजन यांच्यावर पटवार केला आहे. दरम्यान त्यांच्यातील वाद आता विकोपाला जात असल्याचे दिसून येत आहे.

तळोदा (जि. नंदुरबार) येथे मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर घराणेशाहीची खाेचक टीका केली होती. त्यावर पत्रकारांशी संवाद करताना खडसे म्हणाले, मंत्री महाजन हे तळोदा येथे बोलत असताना खासदार हीना गावित त्यांच्या शेजारी उपस्थित होत्या. खासदार गावित यांचे वडील विजयकुमार गावित हे मंत्री आहेत. त्यांची दुसरी मुलगी जिल्हा परिषदेची अध्यक्षा आहे. त्यांचे भाऊ आमदार आहेत. एकाच कुटुंबात ही पदे आहेत. त्यांच्या शेजारी उभे राहून मंत्री महाजन असे वक्तव्य करतात.

एकाच घरात पदे असतात याची मंत्री महाजन यांना अजून कल्पना आलेली नाही. त्यांच्या पत्नी साधना महाजन गेल्या २५ वर्षे सरपंच, जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि आता नगराध्यक्षा आहेत. आपल्याच घरात पदे कशाला पाहिजेत. दुसऱ्याला पदे देता आली असती असे प्रत्युत्तर आमदार एकनाथ खडसे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.

एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोटे आपल्याकडे असतात. साधना महाजन या तुमच्याच कुटुंबातील आहे हे तुम्ही विसरला का? त्यांना २५ वर्षे कशी पदे दिली. दुसऱ्यांना संधी दिली असती ना? दुर्दैवाने गिरीश महाजनांना मुलगा नाही. नाहीतर मुलगा आणि सून दोघांना पदे मिळाली असती आणि कदाचित तेही राजकारणात आले असते असे खडसे म्हणाले.

Team Global News Marathi: