एखाद्याला मुलगा झाला तर विरोधक त्याचही श्रेय घेतात -जितेंद्र आव्हाड

मुंबई:राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात बसलेले भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत अशातच आता मागच्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.ठाण्यातील एका कार्यक्रमात श्रेयवादाच्या राजकारणावरून महाविकासआघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला होता.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्याला मुलगा झाला तरी त्याचं श्रेयही विरोधक घेऊ पाहतात, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. श्रेयवादाची लढाई ठाण्यात आहे, असे मला कधी दिसलेले नाही. पण राजकारणात कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी असं बोलावं लागतं, असे आव्हाड यांनी म्हटले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस

अलीकडच्या काळात काही लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की, ते कशाचेही श्रेय घेतात. म्हणजे एखाद्याच्या घरी लग्न असले तर त्याचे पण श्रेय घेतलं जातं आणि एखाद्या घरी मुलगा झाला तर तो आमच्या प्रेरणेतून झाला, अशा प्रकारे श्रेय घेण्याचे वेगवेगळे प्रयत्न अनेकांचे असतात, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Team Global News Marathi: