कोरोना वरील प्रभावी उपचारासंदर्भात खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’महत्त्वाची मागणी

कोरोना वरील प्रभावी रेमेडेसिविर औषधे रुग्णांना मोफत उपलब्ध करून द्यावीत-राहुल शेवाळे

कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरलेल्या ऍक्टेमरा आणि रेमेडेसिविर या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी मुंबईतील रुग्णांना ही औषधे मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अनेक तक्रारींमुळे ही मागणी करत असल्याचे खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, कोरोनाचा वाढता धोका रोखण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. कोरोनाला रोखण्यात ऍक्टेमरा आणि रेमेडेसिविर ही औषधे काही प्रमाणात प्रभावी ठरली आहेत. मात्र, या औषधांची किमंत जास्त आहे.

तसेच ही औषधे बाजारात सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांचा तुटवडा निर्माण झाला असून काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

अशा परिस्थितीत हा काळाबाजार रोखण्यासाठी ही औषधे मुंबईतील रुग्णांना शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावीत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: