पश्चिम बंगालमध्ये ईडीची छापेमारी; नोटांचे ढिग पाहून थक्क व्हाल…

पश्चिम बंगालमध्ये ईडीची छापेमारी; नोटांचे ढिग पाहून थक्क व्हाल…

कोलकाता : पश्चिम बंगालमधील मंत्री पार्थ मुखर्जी (Parth Chatterjee) यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherji) यांच्या घरावर आज ईडीने छापेमारी (ED Raid) केली. अनेक तासापासून ईडीची छापेमारी सुरुच आहे. आतापर्यंत 20 कोटी रुपयांची रोख रक्कम अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून जप्त करण्याता आली आहे.

घरामध्ये 200 आणि 500 रुपयांच्या नोटांचा अक्षरशः ढीग लागला आहे. बंगाल शिक्षण भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. अर्पिता मुखर्जी यांच्या विरोधात ईडीला काही सबळ पुरावे मिळाल्यानंतर त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला.

 

गेल्या अनेक तासांपासून ही कारवाई सुरु आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत नोटांचा ढिगारा समोर आला आहे. अद्याप कारवाई सुरु असून या ढिगाऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने आपल्या रोख रकमेचे छायाचित्र ट्विट करत याबाबत माहिती दिली.

सूत्रांनी सांगितले की, कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने शुक्रवारी पश्चिम बंगालमधील दोन मंत्री पार्थ चॅटर्जी आणि परेश अधिकारी यांच्या घरांवर छापे टाकले.

 

ईडीचे किमान सात ते आठ अधिकारी सकाळी 8.30 च्या सुमारास चॅटर्जी यांच्या नक्तला येथील निवासस्थानी पोहोचले आणि 11 वाजेपर्यंत छापा सुरू होता. यादरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान बाहेर तैनात होते.

एजन्सीच्या अधिका-यांची आणखी एक टीम कूचबिहार जिल्ह्यातील मेखलीगंज येथील अधिकाऱ्याच्या घरी पोहोचली आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली, असे सूत्राने सांगितले. ईडीच्या सूत्रानुसार, शहरातील जादवपूर भागात असलेल्या पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष माणिक भट्टाचार्य यांच्या निवासस्थानावरही अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: