ब्रिटनमध्येही शिक्षणाबरोबरच जगण्यासाठी संघर्ष; घरभाडे महागल्याने लोक रस्त्यावर

 

ब्रिटनमधील वाढत्या महागाईची झळ उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना बसत आहे. महागाई 9 टक्क्यांनी वाढल्याने विद्यार्थ्यांना जगण्यासाठीदेखील संघर्ष करावा लागत आहे. विद्यार्थ्यांकडे घरभाडे देण्याइतके पैसे नाहीत. डोक्यावर छप्पर नसल्याने नाइलाजास्तव सुमारे 12 टक्के विद्यार्थ्यांना रस्त्यावरच मुक्काम करावा लागला आहे.

काही विद्यार्थी आपल्या मित्राकडे आश्रयाला गेले आहेत तर काही विद्यार्थी पार्टटाइम नोकरीच्या शोधात आहेत. ब्रिटनमधील सुमारे 12 टक्के विद्यार्थ्यांना राहण्यासाठी घर नाही. 5.3 ड्रॉपआऊट, अलीकडेच उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील विविध समस्यांना तोंड देत आहेत. नातेवाईकांकडे राहणाऱया विद्यार्थ्यांनादेखील महागाईचे कारण देत वेगळी व्यवस्था करण्यास सांगितले जात आहे.

सध्या अनेक विद्यार्थ्यांनी महागाईमुळे मायदेशाचा रस्ता धरला आहे. हायर एज्युकेशन पॉलिसी इन्स्टिटय़ूट (हॅपी) यात प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणात याचा खुलासा करण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका परदेशी विद्यार्थ्यांना बसत आहे. यंदा महागाईत प्रचंड वाढ झाली. राहण्याबरोबरच जेवण व विजेचे वाढते दरदेखील विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पाडत आहे. अनेक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातही विद्यापीठाने या अडचणी दूर करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

Team Global News Marathi: